Posts

Showing posts from 2022

फातिमा शेख,एक भारतीय महिला समाजसुधारक.

फातिमा शेख,एक भारतीय महिला समाजसुधारक. इतर अनेक भारतीय महिला सुधारकांप्रमाणेच त्या इतिहासात अज्ञान आणि अज्ञात राहिल्या आहेत. भारतातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आपल्याला फातिमामाई शेख यांच्याबद्दल थोडेसेच माहीत आहे. ते म्हणजे, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्यासोबत सहशिक्षिका म्हणुन शिक्षणामध्ये त्यांचे योगदान. भारताच्या समाजसुधारणा चळवळीत महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांनी १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मुलींसाठी शाळा सुरू करत असताना व त्यांना शिक्षण देत असताना समाजाकडून खुप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला व त्यांना देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा बहुमान मिळाला.या सर्व शैक्षिणक प्रवासामध्ये त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे फातिमामाई शेख यांची. जेव्हा फुले दाम्पत्यांनी दीन-दलितांना व विशेषतः स्त्रियांना शिकवायला सुरुवात केली होती, तेव्हा त्यांना ही प्रथा बंद करण्यास किंवा समाज व घर सोडून जाण्यास सांगितले गेले. तेव्हा या जोडप्याने स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांचे घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यावे